अनैतिक व्यापारावर युवतींमध्ये जागृती-देवानंद देशमुख

0
17

गोंदिया दि.१: गोंदिया एज्युकेशन सोसायटीत द्वारे संचालित स्थानिक एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदिया येथे ओम लक्ष्मीनारायण मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीसाठी तसेच महिला जनजागृतीसाठी अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
२१ व्या शतकात भारतात पाश्‍चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे.या पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू आहे. आधुनिक काळात अनैतिक देहव्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येते.यात विशेषत: महिला व तरूण वयातील मुला-मुलींचे प्राबल्य असते. तरूण मुली आणि लहान बालकांना या अनैतिक व्यापारात ओढल्या जाते. या तरूणी आणि बालकांचे भविष्य, भावी आयुष्य कुस्करल्या जाते.त्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक कायदेविषयक ज्ञान आणि जनजागृती केली तर निश्‍चितपणे ही पिढी योग्य वळणावर येऊ शकेल, असे उद्गार आधार बहुउद्देशिय संस्था नागपूरचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवानंद देशमुख, बाल परिविक्षा अधिकारी प्रविण वाकडे, प्रमोद रंगारी, डॉ. राजश्री धामोरीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक प्रा.निता खांडेकर यांनी केले. संचालन विद्यार्थीनी निहारीका उजवणे तर आभार समता मेश्राम यांनी मानले.
यशस्वीतेसाठी लक्ष्मी पाठक, मीना पटले, कविता कटरे, ज्योती जामरे, देविनी चौधरी, रिना बनकर, नेहा बंसारी, सीमीता टेंभरे, आचल तुरकर, अनिता तुरकर, दिपीका येडे, भारती उईके, लक्ष्मी मनिश्‍वर, पार्वती नागफासे, सुकोतिनी उके, निर्मला उके, विमा रहांगडाले, रत्नमाला पटले, रत्नमाला मेश्राम, दिक्षा पटले, मनिषा देवाधारी, संतोषी कटरे यांनी सहकार्य केले.