राष्ट्रीय कलचुरी /कलार समाजाचा आज परिचय मेळावा

0
9

गोंदिया दि.१ : राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाच्या वतीने १ व २ नोव्हेंबरला गोंदियात राष्ट्रीय स्तरावरील कलार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कलार समाजातील विविध उपजातींना सहभागी करून घेणारा हा गोंदियातील पहिलाच मेळावा असल्याने समाजबांधवांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे.
संयोजक दीपक अग्रवाल यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या मेळाव्यात देशभरातील दोन हजार प्रतिनिधी सहभागी होण्याचा अंदाज असल्याची माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षहुकुमचंद जायसवाल (इंदूर) यांनी सांगितले, माजी मंत्री श्रीपाद नाईक, बनारसचे आ.रवींद्र जायसवाल, कटनीचे आ.संदीप जायसवाल, औरंगाबादचे प्रदीप जायसवाल, रामटेकचे आ.आशिष जायसवाल तसेच वाशिमचे न्यायाधीश संतोष जायसवाल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षदीपक जायसवाल यांनी सांगितले की, १ नोव्हेंबरला प्रताप लॉनमध्ये सकाळी ९ वाजता स्वागत समारंभ, शपथविधी आणि त्यानंतर समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींचा परिचय होणार आहे. पत्रपरिषदेला रमेंद्र जायसवाल, नीरज कटकवार, त्र्यंबक जरोदे आदी उपस्थित होते.