शिक्षकांच्या सर्व समस्या निकाली काढणार-शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम

0
36

गोंदिया,दि.02ः- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदिया व महिला मंच गोंदियाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राजानंद वैद्य यांचे अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांची भेट घेत त्यांचे स्वागत करीत शिक्षकांच्या समस्यावर चर्चा केली.या चर्चेदरम्यान शिक्षणाधिकारी सर्याम यांनी शिक्षकांच्या सर्व समस्या टप्याटप्याने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी  उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यशाळा आयोजित करणे.विषय शिक्षक पदोन्नती व वेतनश्रेणी मिळावी,चटोपाध्याय व निवडश्रेणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी उपशिक्षणाधिकारी डि.एम.मालाधारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी डोंगरे,कक्ष अधिकारी जनबंधू,इळपाते ,पारधीकर व शालू पटले उपस्थित होते.संघटनेच्यावतीने महिला मंच जिल्हा अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे, जिल्हासरचिटणीस हरिराम येळणे, गोंदिया तालुका अध्यक्ष एस.एम.बिसेन,सालेकसा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार कुराये, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम,टि.आर.लिल्हारे, गोरेगाव तालुका अध्यक्ष उत्तम टेंभरे, प्रमोद भांदकर व कार्यकर्ते उपस्थित होते.