पाच महिन्यांच्या ‘सलोनी‘ला टाकून आई निघाली

0
12


पत्नीला शोधून द्या हो ! : पतीचा टाहो

गोंदिया,दि.१३ : पाच महिन्यांची सलोनी, अडीच वर्षांचा शुभम या दोन पोटच्या मुलानांच घरी टाकून आईने दुसरी वाट धरल्याने आज ही मुले आपल्या आईच्या परतीकडे वाट लावून बसले आहेत.दोन- चार दिवस शोधाशोध केल्यानंतर मुलांच्या आईचा पत्ता लागला नाही. अखेर दोन्ही मुलांना घेऊन वडिलाने शनिवारीला (ता. १२) ‘बेरार टाईम्स‘कडे आपबिती कथन केली. पोलिसांकडेही तक्रार दिली,परंतु पोलीसही आमच्यापेक्षा पोलीस पाटलांचे म्हणणे एैकत असल्याने आम्ही करावे तरी काय असे सांगत त्या पत्नीच्या जाण्याने मुलांना काय यातना होतायेत कुणाला सांगू असे सांगत असतानाच सारेच निःशब्द झाले.माझ्या पत्नीला कुणी तरी शोधून द्या हो ! असा टाहो फोडणाèया त्या पतीची अवस्था मात्र मन शुन्न करणारी होती.
गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील दिनदयाल मोहन शहारे (वय ४०) यांची ही कहाणी आहे. पहिल्या पत्नीपासून मुलंबाळं न झाल्याने दिनदयाल शहारेंने गेल्या पाच वर्षापूर्वी प्रतिभासोबत (बदलले नाव) दुसरे लग्न केले. अडीच वर्षापूर्वी त्यांची संसारवेल फुलली. दुसèया पत्नीपासून त्यांना शुभम नावाचा मुलगा झाला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अशातच पुन्हा प्रतिभा गर्भवती राहिली. पाच महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला तिने जन्माला घातले. भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ मिळाल्याने घरात आनंदी वातावरण होते. दोन्ही बायकांसह दिनदयालचा संसार सुखाने सुरू झाला. दिनदयालची मोठी पत्नीही या दोन्ही लेकरांना मायेची ऊब देऊ लागली. मात्र नजर लागावी, असेच काहिशे दिनयालसोबत घडले. १०- १२ दिवसांपूर्वी दुधावरच्या ‘सलोनी‘ला एकटे टाकून प्रतिभा बेपत्ता झाली. तिच्या अचानक बेपत्ता झाल्याने आनंदात असलेले शहारे यांचे घर क्षणात दुःखात परावर्तित झाले.आईच्या दुधापासून सलोनी दूर गेली. अडीच वर्षाच्या शुभमच्या डोक्यावरचे आईचे छत्रही हिरावले गेले. ज्यावेळी खरंच आईची गरज भासते. तिचे प्रेम, वात्सल्य, ममत्व हवे असते, त्याचवेळी आई बेपत्ता झाल्याने दोन्ही मुले पोरकी झाली. १०-१२ दिवसांपूर्वी घरून या लेकरांची आई बेपत्ता झाल्यानंतर दिनदयाल शहारे यांनी दोन- चार दिवस नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेही सापडून आली नाही. अखेर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. परंतु, अजूनही पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. शेवटी दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरचे आईचे छत बेपत्ता झाल्याने द्विधा मनःस्थितीत असलेल्या दिनदयालने मोठी पत्नी व दोन चिमुकल्यांसह आपबिती कथन केली. लेकरांची आई शोधून द्या हो ! असा त्यांचा टाहो ऐकून आणि त्या दोन्ही लेकरांची अवस्था पाहून साèयांचाच कंठ दाटूनी आला. ही आई गेली तरी कुठे असावी ? हा प्रश्न आजही मात्र अनुत्तरित आहे.

पलायन की अपहरण ?
अडीच वर्षाचा शुभङ्क आणि पाच महिन्यांची सलोनी या दोन्ही लेकरांना टाकून बेपत्ता झालेल्या या आईचे पलायन केले qकवा तिचे अपहरण झाले? हे कळायला मार्ग नाही. पाच महिन्यांच्या सलोनीला सोडून आई कशी काय पलायन करू शकते ? हाही प्रश्न आहे. तिचे अपहरण झाले असेल तर, ते कुणी आणि कशासाठी केले असावे, हा देखील प्रश्नच आहे.

महिला, युवतींना परराज्यात विकणारी टोळी सक्रिय?
तिल्ली मोहगाव येथील विवाहित आणि दोन लेकरांच्या आईचे बेपत्ता होण्याने महिला व युवतींना अगतिकतेचा फायदा घेऊन परराज्यात विकणारी टोळी सक्रिय असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संशयाचे कल्लोळ उठत आहेत. मुख्य सूत्रधार जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. दलालामार्फेत लग्नाचे आणि पैशाचे आमिष दाखवून महिला व युवतींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचेही सांगितले जात आहे.