नवेगावबांध केंद्र क्रिडा सत्राचा बक्षिस वितरण सोहळा

0
19
नवेगावबांध:- पुरातण काळापासून गुरूजनांना गुरूदक्षिणा देण्याची परंपरा आपल्या देशात आहे. मात्र आज मी आपल्याकडून उपक्रमशिल शाळा निर्मिती व दर्जेदार शिक्षणासाठी गुरूजनांनी परिश्रम घ्यावेत  असे  मत माजी आमदार दयाराम भाउ कापगते यांनी व्यक्त केले. स्वदेशी खेळोत्तेजक मंडह नवेगावबांध केंद्र क्रिडा सत्राच्या बक्षिस वितरण समारोह प्रसंगी ते अध्यक्ष स्थानकावरून बोलत होते. याप्रसंगी बक्षिस वितरक माजी सभापती  प्रकाश गहाणे, ठाणेदार सुनिल पाटील, स्थानिय सरपंच तामदेव कापगते, उपसरपंच उपसरपंच हेमराज पुस्तोडे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, प.स. सदस्या नाजुकाबाई कुंभरे, तमुस अध्यक्ष मनोहर शेंडे, महाराष्टÑ पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर, गुलाब कापगते, दुर्योधन आरसोडे, शारदाताई भलाडे, सुमित्रा नाहामुर्ते, मुख्याध्यापक कुरसुंगे, मुख्या कापगते, ग्रामसेवक बंसोड, तलाढी वैद्ये, राजेंद्र संग्राम, पितांबर काशिवार, केंद्राध्यक्ष प्रमिला कापगते, डी.टी. सलामे, एच.एम. मेंढे, एल.एस. सेलोकर, एल.डी. सतदेवे आदिंच्या प्रामुख्याने उपस्थित होते.
 प्राथमिक विभागातील मुलींच्या खो-खो मधिल, प्रथम बक्षिस जि.प. प्रा. शाळा पांढरवाणी तर मुलांच्या खो-खो मधील प्रथम बक्षिस सावित्रीबाई ज्ञानपिठ प्रा. शा. बोंउे यांनी पटकावले. तसेच मुलींच्या कबड्डीमधील प्रथम बक्षिस जि.प. प्रा. शाळा मुंगलीने प्राप्त केले. प्राथमिक विभागाच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे प्रथम बक्षिस पांढरवाणी च्या विद्यार्थ्यांनी पटकावले तर प्रेक्षणीय कवायत मधील प्रथम बक्षीस सावित्रीबाई फुलक ज्ञा. शाळा बोंडे ने प्राप्त केले. माध्यमीक विभागातील मुलींच्या खो-खो मधील प्रथम बक्षीस जि.प. वरिष्ठ प्राथ शाळा पांढरवाणी तर मुलांच्या खो.खो मधील प्रथम बक्षिस जि.प. प्रा. शाळा देवलगावने प्राप्त केले. तसेच मुलींच्या कबड्डीमधील प्रथम बक्षिस जि.प. व प्रा. शाळा देवलगाव तर मुलांच्या कबड्डीमधील प्रथम बक्षिस जि.प. प्रा. शाळा देवलगाव ने प्राप्त केले. सांस्कृतीक कार्यक्रमाचे प्रथम बक्षिस जि.प. व प्रा. शाळा देवलगांवने तर शोड्रील मधील प्रथम बक्षिस जि.प. व प्राथ. शाळा परसोडी/रैय्यतने प्राप्त केले.
प्राथमिक विभागाचे प्राविण्य चषक जि.प. व प्रा. शाळा देवलगावने पटकावले या प्रसंगी अहवालावाचन केंद्रसचिव क.एस. पर्वते, संचालन धनंजय कापगते,तर आभार एस.बी. लंजे यांनी मानले. सदर एकंदर १७ शाळेतील क्रिडा सत्रात ३०० विद्यार्थी व ४५ शिक्षकांनी भाग घेतला.