देवरी-नागपूर बसला अपघात

0
12

सडक अर्जुनी,दि.28-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील डुग्गीपार पोलीसस्टेशनच्या हद्दीतंर्गत शशीकरणपहाडीजवळील वळणरस्त्यावर आज सायकांळी साडेसात वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवरी-नागपूर बसला अपघात झाल्याची घटना घडली.या बसमध्ये असलेल्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सु्ट्टी देण्यात आली आहे.याबसमध्ये 10 ते 15 प्रवाशी होते.डुग्गीपारचे पोलीस निरिक्षक केंद्रे यांनी लगेच घटनास्थली पोचून मदतकार्यास सुरवात केली.बस वळणरस्त्यावर असताना वाहकाचा तोल सुटल्याने बसने पलटी घेतली.