एस. चंद्रा शाळेत स्वयंपाकिनीचा मृत्यू

0
11
सडक अर्जुनी,दि. २८ : सडक अर्जुनी येथील एस. चंद्रा पब्लिक शाळेच्या आदिवासी निवासी शाळेतील स्वंपाकीनीचा तिसèया माळ्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी घडली. मृत महिलेचे नाव शिला दिनेश बिसेनकर(वय ४०) असे आहे.
एस. चंद्रा महाविद्यालय ही येथील नावाजलेली संस्था आहे. या शिक्षण संस्थेंतर्गत विविध अभ्यासक्र‘ चालविले जातात. एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आदिवासी विद्याथ्र्यांना शिकविण्याची सोय या संस्थेत करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार आजघडीला अडीचशे अनुसूचित जमातीतील विद्यार्थी निवासी वास्तव्याला असून शिक्षण घेत आहेत. तीन माळ्यांची इमारत आहे. वरच्या माळ्यावर स्वयंपाक तयार केला जातो. परंतु, याठिकाणी सुरक्षाभित तयार करण्यात आली नाही. परिणामी ही इमारत जीवघेणी असल्याचा ठपका अनेकदा ठेवण्यात आला. विद्याथ्र्यांकरिता स्वयंपाक तयार करण्याचे काम  शिला बिसेनकर या करतात. त्या आज स्वयंपाक तयार करण्याकरिता वरच्या माळ्यावर गेल्या. त्यांचा तोल गेल्यामुळे त्या खाली पडल्याने घटनास्थळावरच त्यांचा सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. याची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला. मृत स्वयंपाकीन शिला बिसेनकर यांचा मृत्यू तोल गेल्याने झाला, की त्याच्या मागील नेमके कारण वेगळेच आहे. याचा शोध घेण्याकाम पोलिस गुंतले आहेत.