जि.प.च्या महिला बालविकास अधिकारिपदी अवर सचिव अंबादे रुजू

0
6

गोंदिया,दि.७-गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी या रिक्त असलेल्या पदावर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव ज.म.अबांदे यांची दोनवर्षाकरीता नियुक्ती केली आहे.याकरिता ३१ डिसेंबरला अबांदे यांना सामान्य प्रशासन विभागाने अवर सचिव पदावरून कार्यमुक्त केले आहे.अंबादे हे दोनवर्ष qकवा रिक्त पदावर सरळसेवेने नियुक्तीहोईपर्यंत प्रतिनियुक्तीने कार्यरत राहणार आहेत.अंबादे यांनी ६ जानेवारीला आपल्या पदाची सूत्रे गोंदिया जिल्हा परिषदेत स्वीकारली आहेत.विशेष म्हणजे अबांदे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील असून या आधी त्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा सेवा दिलेली आहे.मूळ जिल्हा असल्यानेच त्यांनी शासनाकडे सेवेची संधी मागितली आहे.