युवराजसिंह क.महाविद्यालयत स्नेहसंमेलन

0
10

गोंदिया : युवराजसिंह कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चुटिया येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आला. उद््घाटन जि.प. सदस्य शैलेजा सोनवाने यांच्या हस्ते डी.आर. गौतम यांच्या अध्यक्षस्थानी करण्यात आले. अतिथी म्हणून मुख्याध्यापक बी.जी. बिसेन, ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीचे सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. क्रीडासत्राचे उद््घाटन सरपंच चंद्रकला तुरकर यांच्या हस्ते उपसरपंच रामू शरणागत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून डॉ. गंगाराम टेंभरे, हिरालाल टेंभरे, ग्रामपंचायत व तंमुसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद््घाटन पोलीस उपनिरीक्षक हत्तीकोटे यांच्या हस्ते संजय टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.अतिथी म्हणून मुनेंद्र नांदगाये, रतन बघेले व इतर मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद््घाटन मुख्याध्यापक वाय.यू. चौधरी यांच्या हस्ते जि.प. सदस्य सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून टीकाराम टेंभरे व इतर मान्यवर उपस्थित होते. वार्षिकोत्सवात विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.