गरोदर मातांसाठी हितकारी दिव्य माता-बालक योजना

0
17

गोंदिया  दि.१3:: गरोदर मातांसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व ब्रह्मकुमारीज संस्थेद्वारे संयुक्तपणे राबविण्यात येणार्‍या दिव्य माता बालक प्रकल्पाच्या माध्यमातून गरोदर मातांना संतुलित, सात्विक व पौष्टिक आहार देण्यासंबंधी व होणारे शिशु मानसिक, बौध्दीक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य व्यायाम व योगशिक्षा देण्यात येत आहे.
ब्रह्मकुमारीज शाखेच्या संचालिका बी.के. रत्नमाला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली चमु क्रं. ५ ने प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा व कुर्‍हाडी येथील १५0 गरोदर मातांना सदर माहिती दिली. गरोदर मातेचे आहार, विहार व विचार यांचा येणार्‍या शिशूवर थेट प्रभाव होतो. म्हणून या काळात या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. तसेच लहान बालकांचासुध्दा संगोपन करताना या माहितीचा लाभ होऊ शकते, अशी माहिती आरोग्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत देण्यात आली. बी.के. मंगला, डी.के. वैशाली यांनी शारीरिक व्यायाम व योग साधनाचे महत्व यावर बी.के. छबीकला तर डॉ. जितेंद्र मेंढे यांनी शाकाहारी भोजनाचे महत्व सांगितले.