इंग्रमी माध्यम प्रवेश २५ जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

0
5

गोंदिया,दि.१३ : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याकरीता आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत नागपूर विभागातील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल (१) खैरी परसोडा ता.रामटेक जि.नागपूर (२) बोरगाव/बाजार ता.देवरी जि.गोंदिया (३) तुमरगुंडा ता.एटापल्ली जि.गडचिरोली (४) देवाडा ता.राजुरा जि.चंद्रपूर येथे इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा चालविण्यात येत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश प्रक्रीयेच्या आधारावर प्रवेश दिला जात असून सन २०१६-१७ मध्ये इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशाकरीता १३ मार्च २०१६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेकरीता इयत्ता ५ वीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष रुपयांपेक्षा कमी असावे. सन २०१६-१७ मध्ये एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे परिपूर्ण भरलेले अर्ज देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्‍प अधिकारी/अनु.आश्रमशाळा/आदिवासी मुलांचे वसतीगृहाचे शासकीय गृहपाल/मुलींचे वसतीगृह यांच्याकडे २५ जानेवारी पर्यंत सादर करावे. असे एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल बोरगाव(बाजार)चे प्राचार्य यांनी कळविले आहे