नवोदयच्या परिक्षेत मराठी भाषेच्या विद्यार्थ्यावंर अन्याय

0
1574

गणित विषयात 5 प्रश्नामंध्ये हिंदी भाषेच्या शब्दांमुळे विद्यार्थी गोंधळले

गोंदिया,दि.30ः नवोदय विद्यालयासाठी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परिक्षेत मराठी माध्यमांचे विद्यार्थी प्रश्नपत्रिकेत आलेल्या हिंदी भाषेच्या शब्दामुळे 5 प्रश्नांच्या उत्तरात गोंधळले गेल्याचे आज 30 एप्रिल रोजी झालेल्या परिक्षेदरम्यान समोर आले आहे.या प्रश्नामुळे मराठी भाषेतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने त्या प्रश्नांचे गुण देण्यात यावे अशी मागणी पुढे आली आहे.

नवोदय प्रवेश परिक्षेच्या गणित विषयातील प्रश्न क्रमांक 46,47,51,59,50(एफ)मध्ये पहिंदी शब्दांचा वापर करण्यात आल्याने मराठी भाषेतील विद्यार्थी गोंधळले गेली आणि 5 गुणांनी मागे पडले.ज्या प्रश्नात हिंदी शब्द आलेत,त्या प्रश्नांचे सरासरी साडेसात गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे.महाराष्ट्र शैक्षणिक परिक्षा मंडळाने या विद्यार्थ्यावर अन्याय न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे चुकीच्या प्रश्नांचे गुण द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा पालकांनी दिला आहे.