संघी टॉपर्स अवार्ड समारोह ४ फेबुवारीला

0
10

 

आमगव,दि.२९- संघी परिवारातर्फे प्राविण्यप्राप्त विद्याथ्र्यांना दरवर्षी संघी टॉपर्स अवार्डने गौरविण्यात येते. यंदादेखील या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त चार फेब्रुवारी रोजी भवभुती महाविद्यालय, आमगाव येथे करण्यात आले आहे. संघी टॉपर्स अवार्डसाठी श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी रुखसार परविन सैय्यद, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड.ची विद्यार्थिनी मंजू बनोठे, डी.टी.एड.ची विद्यार्थिनी अल्का चौधरी, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी समीरकुमार मेश्राम, आदर्श विद्यालय आमगाव १२ वी विज्ञानची विद्यार्थिनी अबोली मेश्राम, आदर्श विद्यालय येथील १० ची विद्यार्थिनी वैष्णवी शेंडे, भवभुती महाविद्यालयातून बी.एस.सी.मधून ममता शिवणकरचा समावेश आहे. या सर्व विद्याथ्र्यांना संघी टॉपर अवार्ड स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केशवराव मानकर, सुरेशबाबू असाटी, प्राचार्य डी.के. संघी यांनी केले आहे.