युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने काढले १00 कामगार

0
6

तुमसर दि.29: युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १00 रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी कामगार संघटना स्थापन केल्याने रोजंदारी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद आहे.नियमानुसार वेतन, सुविधा नाही, महिन्यातून जेव्हा कारखान्यात काम राहील, तेव्हा बोलाविण्यात येईल, असा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. याप्रकरणी कामगारांनी तुमसर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
माडगी (मानेकनगर) येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे १00 रोजंदारी कामगार आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रथम महिन्यातून २६ दिवस, नंतर १९ दिवस व एक महिन्यापूर्वी कामगार संघटना स्थापन केल्यानंतर जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा बोलाविण्यात येईल, असा आदेश कंपनी व्यवस्थापनाने दिला. गुरुवारी सकाळी ८ वाजता १00 कामगार आले. परंतु कारखान्याच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कारखान्यात जाण्यासाठी मज्जाव करून तुम्हाला कारखान्यात जाता येणार नाही, असे सांगितले.रोजंदारी कामगार रामदास हलमारे, कैलास दामन, मुरलीधर कनपटे, चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, मुकुंद बांते कारखान्यात दि. १६ जानेवारीला आले होते. तेव्हा अधिकार्‍यांनी अर्वाच्च शब्दात बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली, परंतु पोलिसांकडून चौकशी करण्यात आली नसल्याचाही कामगारांनी आरोप केला आहे.