भटक्या कुटुंबातील २७ मुले शाळेत दाखल

0
17

गोरगाव,दि.२-जडीबुटीच्या आर्युवेदिक औषध विक्रीकरिता खेड्यापाड्यात भटकंती करणाèया भटक्या समाजातील मुले मुली शिक्षणापासून वंचित राहतात.शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश असल्याने येथील बसस्थानक परिसराजवळ आपले बस्तान मांडून असलेल्या १० ते १२ कुटुंबातील २७ मुले-मुलींना त्यांच्या वयोगटानुसार येथील शाळेत दाखल करण्यात आले आहे.हे कुटुंब राज्यातील म्हणजेच नागपूर नजीकच्या मनसर येथे मुक्कामी राहणारे परंतु, हे मूळचे राजस्थान राज्यातील आहेत.
कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हे शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार निर्देश देण्यात आले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी दरम्यान शिक्षण विभाग शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेत दाखल करीत आहे.गेल्या १० दिवसांपासून स्थानिक बसस्थानक चौकाजवळ जडीबुटीतून औषध निर्माण करून विक्री करणारे भटकंती समाजातील अनेक कुटुंबांनी बिराड मांडले होते.त्या कुटुंबांमध्ये ३० ते ३५ मुले-मुली आहेत. सर्व मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, जितके दिवस इथे आहात, तितके दिवस मुलांना शिक्षणाचे धडे देता येईल असे सांगितले.पण त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यशवंत कावळे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी त्या कुटुंबाची समजूत घातली. यावर २७ मुला-मुलींनी त्यांच्या वयानुसार वर्गात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये १८ विद्यार्थी जिल्हा परिषद शहीद जाम्या-तिम्या माध्यमिक विद्यालयात, ९ विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव येथे दाखल करण्यात आले आहेत.
या मुलांना शाळेत आण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कावळे, विषयतज्ज्ञ सतीश बावणकर, सुनील ठाकूर, भास्कर बहेकार, ओमप्रकाश ठाकरे, गोविंद ठाकरे, शालिनी रहांगडाले तसेच जि.प. शाळेचे मुख्याध्यापक एस.ए.आकरे, ए.ई.चाकाटे, शिक्षक अनमोल उके, व्यवस्थापक समितीचे नंदलाल सोनवाने, ध्रुवराज वैद्य आदींनी परिश्रम घेतले.