मांग-गारोडी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार – ना. बडोले

0
12

तिरोडा दि.2: मांग-गारोडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमिनी नाहीत, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे. हे सर्व घडत आहे ते फक्त शिक्षणाच्या अभावामुळेच. त्यामुळे काहीही करा पण मुलांना शिक्षण द्या. मांग-गारोडी समाजाच्या सर्व समस्या शाषण सोडविणार असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे रविवारी मांग-गारोडी समाजाच्या वतीने समस्या मांडण्याकरिता आयोजित मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. या वेळी सभेत प्रामुख्याने माजी आमदार हरीश मोरे, समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड, तहसीलदार रवींद्र चव्हाण, जि. प. सदस्य मनोज डोंगरे, विदर्भ अध्यक्ष नेवेलाल पाथरे, मेश्रीलाल शेंडे, सरपंच गीताबाई नेवारे, सरपंच निर्मला भांडारकर, प्रकाश शेंडे आदी उपस्थित होते.
१९५० आधीचे दाखले मिळण्याची अट असल्याने हे दाखले मिळवितांना फार त्रास होतो. त्यामुळे २८ फेब्रुवारी आधी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या माध्यमातून मांग-गारोडी समाजासाठी शिवीर घेतले जाईल व जातीचे प्रमाणपत्र तयार केले जातील. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे कार्ड व रेशन कार्ड तयार केले जातील. तसेच शिक्षित युवक-युवतींसाठी बार्टीच्या माध्यमातून शिवीर घेऊन प्रशिक्षण दिले जाणार असून नोकरीकरिता मदत केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रकाश शेंडे यांनी प्रास्ताविक करतांना समाजाच्या अनेक समस्या बाबतीत माहिती दिली. यावेळी समाजाच्या वतीने ना. बडोले यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड यांनीही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून अपेक्षा असल्याचे सांगून मंत्री समाजाच्या समस्या ऐकायला आल्याने समाज त्यांचा आभारी असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे आभार विकास शेंडे यांनी मानले.नत्थू बिसने, भाउदास उमे, ऐकनलाल कांबळे, मेरवान कांबळे, रिगबीर उमे, राजेंद्र शेंडे, मिश्री उमे, बाबूराव शेंडे, शंकर दुनाडे, प्रभू पात्रे, धनपाल वाघमारे, काल्या दुनाडे, शिवाजी कांबळे, रमेश शेंडे, बाळू बिसेन, कपूरqसह कांबळे, अनिल वाघमारे, दिलीप पात्रे, बाबा कांबळे, बंडू कांबळे, मनोहर शेंडे, खुशाल बिसेन, चैनलाल कांबळे, उमेश शेंडे, वामन कांबळे, सूर्यभान बिसने, ईश्वर शेंडे, जीवन उमे, अशोक कांबळे, किशोर नाडे आदींनी सहकार्य केले.