देवरी तालुक्यात १६६८ विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा

0
17

 

देवरी दि. १६ –तालुक्यात गुरुवारपासून सुरू होणाèया इयत्ता १२ वीच्या परीक्षेत १६६८ विद्यार्थी सहभागी होणार असून सर्व परीक्षा केंद्रावर पंखे आणि कुलरची व्यवस्था मात्र बंधनकारक करण्यात आली आहे.सहा केंद्रामद्ये मनोहरभाई पटेल क.म.देवरी १८२ विद्यार्थी,श्रीमती के.एस.जैन कला क.म.देवरी १७७,श्रीराम विद्यालय चिचगड ४४५,शास.पोस्ट बेसीक आश्रमशाळा पुराडा ३०३,सिद्धार्थ क.महाविद्यालय डवकी ३५९ आणि छत्रपती शिवाजी ज्यू.कॉलेज देवरी येथे २०३ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर व उपकस्टोडीयन मोरेश सुर्यंवशी यांनी दिली.