२१ हजार ३८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

0
19

गोंदिया दि. १६: नागपूर बोर्डाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा येत्या १८ फेबुवारी पासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील २१ हजार ३८१ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून परीक्षा मंडळातर्फे ६९ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
१८ फेबुवारी ते २८ मार्च २०१६ दरम्यान इयत्ता १२ वी परीक्षा सुरू राहणार आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात ६ भरारी पथके राहणार असून अनुक्रमे माध्यमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, निरंतर शिक्षणाधिकारी व महिला पथक यांचा समावेश राहणार आहे. विभागाीय शिक्षण मंडळाच्या निर्देशाानुसार केंद्र संचालक, अतिरिक्त केंद्र संचालक तथा प्रत्येक तालुक्याकरीता एक परिक्षक असे आठ परीक्षक वेंफ्द्रे नेमलेले आहेत. परीक्षा केंद्र वर गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोक बंदोबस्त राहणार आहे. केंद्रासून १०० मीटरपर्यंत प्रतीबंध क्षेत्रात सयंचलीत झेरॉक्सकेंद्र बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात १२ वी चे ६९ परीक्षा वेंफ्द्रातून २१ हजार ३८१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोंदिया शहर ७ आणि ग्रामीणमध्ये १४ परीक्षा वेंफ्द्रे राहणार आहेत. तालुकानिहाय तिरोडा १०, आमगाव ५, देवरी ६, अर्जुनी मोरगाव ७, सडक अर्जुनी ७, गोरेगाव ७ आणि सालेकसा तालुक्यात ६ असे एकजत ६९ परीक्षा वेंफ्द्रे नियोजित करण्यात आले आहेत. सदर परीक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसुल विभागाचे प्रमुख संबंधीत तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांचेसह सर्वांचा समावेश राहणार आहे.