कमी संख्येच्या शाळा बंद करू नये यासाठी निवेदन

0
32

वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया

गोंदिया-वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटने कडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पटसंख्या ० ते २० चे खाली असलेल्या जि.प. च्या शाळा बंद न करणे बाबत निवेदन देण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाने जि.प. अंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या ० ते २० चे खाली आहे अशा शाळा बंद करण्याच्या सूचना यंत्रणांना दिलेल्या आहेत . मात्र शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून टोली, तांडा , वस्ती , पाड्यातील गरिब , वंचित , मागासवर्गीय मुलांचे शिक्षण हक्क नाकारणारा आहे . सोबतच वरील पटसंख्येमुळे बंद होणाऱ्या शाळेवर कार्यरत शिक्षकांच्या सेवेचाही प्रश्न उद्भवणार आहे . आधीच गत ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी वाढलेली असतांनी कार्यरत असलेले रोजगार संपविणे हे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला साजेसे नाही . शिक्षण विभागाच्या ह्या निर्णयाविरुध्द ग्रामिण , वंचित व मागासवर्गीय जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. अशा प्रकारचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविरोधी धोरणाला वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेने विरोध दर्शवत संघटनेचे महेश राठोड अध्यक्ष, प्रदीप राठोड सचिव,विलास राठोड कोषाध्यक्ष, सुनील जाधव उपाध्यक्ष मधुकर जाधव, ज्ञानेश्वर राठोड, किशोर राठोड व संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अशा अन्यायकारक धोरणला विरोध म्हणून निवेदन देण्यात आले.