शिक्षक समितीतून संघात शिक्षकांचा प्रवेश

0
14

आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा आमगावची विशेष सभा शिक्षक भवनात पार पडली.  अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे होते. अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष आनंद पुंजे, जिल्हा नेते डी.टी. कावडे, जिल्हा सरचिटणिस एस.यू. वंजारी, शाखाध्यक्ष नागसेन भालेराव, ओमेश्‍वरी बिसेन, केदार गोटेफोडे, सुधीर वाजपेयी, अजय चौरे, आर.एन. घारपिंडे, एस.पी. कुंभलवार, तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभारे, सचिव आर.एन. उपवंशी, एच.एस. बोपचे, राजू पाटील, डी.बी. पटले उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्याबाबत ठराव घेण्यात आला. तसेच शिक्षक समितीमधून मोठय़ा प्रमाणात शिक्षकांनी शिक्षक संघात प्रवेश केला. यात एन.एस. कोरे, जे.डी. मेश्राम, आर.डी. भलावी, एन.आर. मोटघरे, डी.एफ. डोये, यू.जी. फरदे, एस.डी. मडावी, मनोज पंधरे व त्यांच्या सर्मथकांचा समावेश आहे. सदर सर्वांचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीने स्वागत केले. या वेळी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी एम.झेड. नांदगाये, महेश वैद्य, एन.जी. कातकडे, बी.पी. दराडे, जितू गणवीर, एम.एन. क्षिरसागर, के.एम. मोटघरे, आर.एस. मेंढे, व्ही.बी. कडपाते, ओ.टी. केवट, आनंद डोंगरे, सतिश नागपुरे, शालिक कठाणे, सी.जी. जांभूळकर, व्ही.एल. वालोदे, जी.एस. नेताम, डी.टी. गिर्‍हेपुंजे, एन.एल. ब्राह्मणकर, संतोष बिसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.