कलार समाजाच्या पुस्तकाचे विमोचन

0
11

गोंदिया : कलार समाजाच्या आदर्श चरित्र दर्शन पुस्तकाचे विमोचन प्रा. धनराज ओक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून दि विदर्भ प्रिमीयर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नागपूरचे अध्यक्ष रवींद्र दुरूगकर, डॉ. सुधीरकुमार रणदिवे, केशोराव मानकर, मुकेश शिवहरे, श्याम चंदनकर, आशिष बारेवार, तीर्थराज उके, नरेंद्र धुवारे, रेणुका डोंगरे, सुरेश चौरागडे, लक्ष्मण बारेवार, दुर्गा तिराले उपस्थित होते. यावेळी अतिथीचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. धनराज ओक यांनी लिहीलेल्या आदर्श चरित्रावर माहिती दिली. संचालन अँड. विरेंद्र जायस्वाल तर आभार नरेंद्र धुवारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रामनारायण भोयर, रामेश्‍वर मानकर, दिनेश फरकुंडे, गोलु डोहरे, शकुंतला चंदनकर, संतोष मानकर, सुरेश चंदनकर, प्रमोद चौरागडे, झनक मानकर, चनिराम मेश्राम, राजेश वर्‍हाडे, हरिश गुप्ता, राजेश तोलानी, शारदा सोनकनवरे, प्रफुल उके, सुखराम हरडे, ललीत शहारे, श्रीकांत उके, प्रेम मेश्राम, देवकिशन सार्वे, चंद्रशेखर बाजनघाटे यांनी सहकार्य केले.