मारुती सुझुकीच्या कार महागल्या

0
7
नवी दिल्ली- अर्थसंकल्प-2016 (बजेट) मध्ये ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर इंफ्रास्ट्रक्‍चर सेस (उपकर) लावण्यात आल्याने मारुती सुझुकीच्या कार महागल्या आहेत. कारच्या किमतीत 1,441 व 34,494 रुपयांपर्यंत वाढ केल्याची घोषणा मारुती सुझुकीने इंडिया लिमिटेडने केली आहे.

कंपनीने स्‍मार्ट हायब्रिड मॉडेल्‍स सोडून इतर सर्व मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे. परिणामी
सिआझ एसएचव्हीएस व इर्टिगा एसएचव्हीएसच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे मारुती सुझुकीचे एक्झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर (मार्केटिंग अॅण्ड सेल्‍स) आरएस कल्‍सी यांनी सांगितले आहे.

मारुतीची एंटी लेव्हल कार ‘ऑल्‍टो 800’ची ‍किंमत 1,441 रुपयांनी वाढली आहे. कंपनी हा निर्णय घेतला आहे. सरकारने बजेटमध्ये कारवर 4 टक्क्यांपर्यंत इंफ्रा सेस लावला आहे.

टाटा मोटर्सने 35 हजार रुपये तर मर्सिडिजने 5 लाख रुपयांपर्यंत आपापल्या प्रवाशी कारच्या किमतीत वाढ केल्याची घोषणा केली होती.