जेटकिंगची १0 वर्षात यशस्वी वाटचाल

0
8

नागपूर : देशभरात आयटीच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या जेटकिंगने २00६ मध्ये नागपुरात केंद्र स्थापन केले. या दहा वर्षात जेटकिंगने संस्थेतील ३ हजारावर विद्यार्थ्यांना जॉब उपलब्ध करून दिले आहे. २0२0 पर्यंत देशभरात १ कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे मत जेटकिंगचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भारवानी यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
पत्रपरिषदेला जेटकिंगचे संचालक शैलेश वर्मा, अश्‍विन माकन, विभागीय व्यवस्थापक मनोज सिंग, सेंटर हेड सुधाकर महाजन उपस्थित होते. जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाचेही प्रशिक्षण देण्यात येते.
३0 जानेवारी २0१६ ला जेटकिंगच्या गोकुळपेठ येथील संस्थेने आयोजित केलेल्या जॉबप्लेसमेंटमध्ये संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर अँल्युमनी मिट’ आयोजित करण्यात आली होती. यात नव्याने प्रशिक्षणार्थींना आयटी क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. येत्या १५ एप्रिलला जेटकिंगतर्फे मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात जेटकिंगने ऑनलाईन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नावाने ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना जेटकिंगचे अँप्स डाऊनलोड केल्यावर ऑनलाईन प्रशिक्षण मिळते आहे. त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत मुलींसाठी अभ्यासक्रमात ५0 टक्क्यांची सूट व ५0 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा संस्थेचा मानस आहे.