२० मार्चला बलिदान दिन कार्यक्रमाचे गोंदियात आयोजन

0
12

 

गोंदिया- अमर शहीद विरांगणा महारांनी अवतंीबाई लोधी स्मारक समितीच्यावतीने २० मार्च रोजी बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत आयोजित कार्यक्रमात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये स्वातंत्र्य संग्रामी महीला ज्यांनी सन १८५७ च्या लढाईचे नेतृत्व करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देता देता शहिद झाल्या त्या महान क्रांतिकारी अमर शहीद वीरांगना महारानी अवंतीबाई लोधी यांच्या १५८ व्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट अभिनेता राकेश राजपूत राहणार आहेत.उदघाटन उद्योगपती दुध्दराम सव्वालाखे यांच्या हस्त होणार आहे.
येथील अमर शहीद वीरांगना महारानी अवंतीबाई लोधी चौक, रिंग रोड, गोदिंया येथे आयोजित कार्यक्रमात ३ वाजता वृक्षारोपण,४ वाजता स्वच्छ भारत अभियान, ५ वाजता अमर शहीद वीरांगना महारानी अवंती बाई लोधी यांच्यावीरते वर प्रबोधन,सायंकाळी ६ वाजता लोधी समाज महाराष्ट्राला केंद्राच्या ओबीसी यादीत सहभागी करुन घेण्यावर चर्चा आणि सायकांळी ७ वाजता ‘एक शाम शहीदों के नाम‘ या कवि सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला लीलाधर सुलाखे (सामाजिक विशेषज्ञ),रामकिशोर रंनगीरे (सरपंच नैत्रा),नरेंद्र बेहरे (नगर सेवक, हींगणा, नागपुर),श्रीमती फुलकनबाई मोहारे (सरपंच, खैरी, बालाघाट),कन्हैयालाल नागपुरे (महामंत्री, बालाघाट), माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, माजी आमदार भागवतभाऊ नागपुरे, जि.प.सभापती छायाताई दशरे,जि.प.सभापती विमलताई नागपुरे,जि.प.सदस्य कमलेश्वरीबाई लिल्हारे,कुंदन कटारे,विठोबा लिल्हारे, प.स.सदस्य योगराज उपराडे, हितेन्द्र लिल्हारे,डुलेश्वरीबाई नागपुरे,प्रमीलाबाई दसरिया, भरत लिल्हारे,माजी जि.प.अध्यक्ष रजनीदेवी नागपुरे,माजी सभापती विराजवंतीदेवी नागपुरे,संकुलताबाई खजरे,रमेश लिल्हारे,रुपचंद ठकरेले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आयोजनासाठी संयोजक इंजि राजीव ठकरेले,शिवराम सवालाखे,दयारामजी तिवडे,कमलकीशोर लील्हारे,उमेश बंभारे, निरज नागपूरे, ललित खजरे, राजेश नागपुरे, अरविंद उपवंशी, बिजेश चिखलोंडे, अनिल नागपुरे (मोंगरा), राजु लिल्हारे, गरिमा मुटकुरे,रानी कटारे,ममता कटारे,ममता ठकरेले,सीमा दमाहे,भाविका बघेले, कल्याणी डहारे परिश्रम घेत आहेत.