जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन, जलजागृती सप्ताहाचे थाटात उद््घाटन

0
14

भंडारा : जल ही संपत्ती आहे. संपत्ती निर्माण करता येते. मात्र पाणी ही अशी संपत्ती आहे जी निर्माण करता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करुन त्याचे योग्य जतन करणे आपली जबाबदारी आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी पाणी साठवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
पाण्याच्या नियोजनाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ आज वैनगंगा नदीघाटावर झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, गोसेखुर्द सर्कलचे अधीक्षक अभियंता र.ना. ठाकरे, कार्यकारी अभियंता पदमाकर पाटील, सोनाली चोपडे, उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातून वाहणार्‍या कन्हान, सुर, बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगा या पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन करुन ते वैनगंगा नदीत विद्याथीर्नींच्या हस्ते सोडण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी पाणी बचतीसाठी जलप्रतिज्ञा घेतली.