जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सुचना

0
11

गोंदिया, दि.20 :–  सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आरक्षित (अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र) प्रवर्गातून १२ वी विज्ञान शाखा व व्यावसायिक शिक्षणाकरीता बी.ई., वैद्यकीय पदवी, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.एड., एल.एल.बी, एम.बी.ए. पदवी अभ्यासक्रमाला सीईटी व कॅप अंतर्गत प्रवेशाकरीता अर्ज सादर केले असेल अशा विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणीचे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे सादर केले असल्यास प्राप्त व सबळ पुरावे नुसार बहुतांश विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आलेले आहे. त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जात वैधता प्रमाणपत्र नियमित पाठविण्यात येत असुन अर्जदारांनी त्यांचे ई-मेल आयडीवर तपासून प्राप्त करून घ्यावे.

         ज्या अर्जदारांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही व ज्यांचे प्रकरणात त्रूटी आढळून आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी समिती कार्यालयाव्दारे त्यांचे ई-मेल आयडी व पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या आहेत. तथापी, अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटी पुर्तता केलेली नाही व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलव्दारे प्राप्त झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी पुर्तता संदर्भात आवश्यक त्या मुळ व अतिरिक्त पुराव्यासह तात्काळ २२.०५.२०२३ ते २६.०५.२०२३ रोज सोमवार ते शुक्रवार ला कार्यालयात उपस्थित राहावे.

         तसेच सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका सन २०२२ पार पडल्या अशा विजयी झालेल्या उमेदवारांचे मागासवर्गीयांचे आरक्षित प्रवर्गातुन प्रस्ताव समिती कार्यालयात ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात सादर करण्यात आले होते. ज्या उमेदवारांचे प्रस्ताव वैध करण्यात आले त्यांचे ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र पाठविण्यात आले असुन ते अर्जदारांनी प्राप्त करुन घ्यावे.

तसेच ज्या उमेदवारांचे प्रकरणात त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा उमेदवारांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी समिती कार्यालयाव्दारे त्यांचे ई-मेल आयडी व पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या आहेत. अशा उमेदवारांनी जाती दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी पुर्तता संदर्भात आवश्यक त्या मुळ व अतिरिक्त पुराव्यासह तात्काळ २२.०५.२०२३ ते २६.०५.२०२३ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहावे.

        अर्जदार या कालावधीत उपस्थित न झाल्यास व त्यांचे प्रकरणात त्रुटी पूर्तता न करु शकल्यास नियमानुसार त्यांचे प्रकरण नस्तीबध्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात पडताळणी समिती राजेश पांडे यांनी केले आहे.