नवोदयच्या नऊ जागांसाठी चौदाशे विद्यार्थ्यांचे अर्ज

0
13

नवेगावबांध :  मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येणार्‍या जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता नववीकरीता होणारी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समितीमार्फत घेण्यात येणारी ही परीक्षा रविवारी (दि.२४) होणार होती. इयत्ता नववीमध्ये फक्त नऊ जागा रिक्त आहेत. मात्र त्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १४११विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज दाखल केलेले आहेत.
सदर परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून मार्च महिन्यातच अर्ज मागविण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांकडून एवढा मोठा प्रतिसाद मिळेल याची कुणाला कल्पना देखील नव्हती. परंतु नवोदय विद्यालय व्यवस्थापनाने संपूर्ण विद्यार्थीपरीक्षेला बसतील अशी व्यवस्था नवेगावबांध येथे केलेली आहे.
सदर परीक्षेसाठी नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालय, स्व.आर.पी.पुगलिया महाविद्यालय, जि.प. विद्यालय व श्रीमती उमाबाई संग्रामे विद्यालय या चार ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. दज्रेदार शिक्षण मिळावे असे प्रत्येक विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना वाटत असते.
सदर नवोदय विद्यालय हे सर्व सोई-सुविधांनी युक्त असल्याने विद्यार्थी व पालकांकडून एवढा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे प्राचार्य एम.एस.बलवीर यांनी सांगितले.