आरोपींना त्वरित अटक करा

0
9

गोंदिया : येथील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी श्री अग्रसेन स्मारक समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे. पत्र परिषदेला संबोधी करताना आमदार अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्या हल्यचा श्री अग्रसेन स्मारक समिती व अग्रवाल समाजाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणीही समितीने निवेदनातून केली आहे. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना समिती अध्यक्ष राम अग्रवाल, सचिव सुशिल सिंघानिया, कोषाध्यक्ष मनिष अग्रवाल, निर्मल अग्रवाल, राजू पोद्दार व अन्य उपस्थित होते.