ग्रामीण विकासात दूरशिक्षणाद्वारे पदविका

0
18
प्रारंभी १९५८ मध्ये नॅशनल इन्स्टिट्युट कम्युनिटी डेव्हलपमेंट या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. पुढे १९६५ मध्ये संस्थेचे स्थलांतर हैदराबाद येथील संकुलात करण्यात आले आणि १९७७ मध्ये या संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट असे नामकरण करण्यात आले आहे. हैदराबादपासून १५ किमी मधील राजेंद्रनगर येथे ही संस्था आहे. या संस्थेने २००८ साली सुवर्ण जयंती साजरी केली. गुवाहाटी, पाटणा आणि जयपूर येथे या संस्थेची विभागीय केंद्रे आहेत.

या संस्थेने नुकतीच १२ व्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा, समूहचर्चा आणि व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल. या आधारे उमेदवारांची अंतिम निवड होईल. लेखी परीक्षा दि. २९ मे, २०१६ रोजी बंगळुर, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिमापूर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटणा, पुणे आणि थिरुवंतपुरम या केंद्रांवर होईल. यापैकी कुठलेही केंद्र रद्द करण्याचा किंवा नवीन केंद्र स्थापन करण्याचा, उमेदवारांना ते बदलून देण्याचा अधिकार संस्था राखून ठेवत आहे. संस्थेत वसतिगृहाची आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार विविध संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे, २०११६ अशी आहे.

संस्थेच्या अधिक माहितीसाठी www.nird.org.in/pgdrdm या संकेतस्थळास भेट द्यावी.

पत्ता

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज,
राजेंद्रनगर, हैदराबाद – ५०० ०३० भारत.
दूरध्वनी क्र. – ९१-०४०- २४००८४६०
ईमेल – [email protected]