शहीद मिश्राचे तीन विद्यार्थी प्रथम क्रमांकात

0
8

तिरोडा –दि. २५ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के लागला आहे.आज ज़ाहिर झालेल्या 12 वि च्या निकालात तिरोडा  तालुक्याचा निकाल 87.42 टक्के लागला आहे.तालुक्यात एकूण 2578 विद्यार्थ्यनि परिक्षे चा फॉर्म भरलेला होता,त्यात 2576 विद्यार्थी परिक्षे ला बसलेले होते.त्या मधे 2252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्यात s.n. साइंस कॉलेज सरांडी तालुक्यात सर्वात जास्त निकाल लागलेला आहे.तेथील 87 पैकी 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.85 टक्के निकाल असून तालुक्यात बाज़ी मारली आहे.तालुक्यातील सर्वात कमी निकाल z.p. कन्या जूनियर कॉलेज,तिरोडा येथील असून 27 पैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण  झाले असून महाविद्यालचा 55.56 टक्के निकाल लगलेला आहे.

आज ज़ाहिर झालेल्या बारावी च्या निकालात प्रथम स्थानावर  शहीद मिश्रा विद्यालय चे तीन विद्यार्थी आगडा वेगडा विक्रम नोंदवित प्रथम स्थानावर राहिले.त्या मधे तिघांना  सारखेच गुण मिळाले.650 पैकी 559 गुण तिघांना आहेत.त्यात कुमारी प्रेरणा नामदेव रहांगडाले,सायली बोकडे,विजेंद्र आगाशे हे त्रिकुट प्रथम येणारच पहिलीच  असल्याचे बोलले जात आहे.शहीद मिश्रा जूनियर कॉलेज हे तालुक्यातील नामांकित व फार जूना कॉलेज आहे.यातील 307 विद्यार्थया  पैकी 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा 91.86 टक्के निकाल लागला आहे.