अन्यथा दोषी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई

0
10

भंडारा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अपूर्ण आढळून आलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देवून जे कंत्राटदार कंत्राट घेऊनही काम व्यवस्थित करत नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साकोली व लाखांदूर तालुक्यातील कृषि विभाग व इतर यंत्रणाकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. साकोली तालुक्यातील पाथरी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषि विभागाची पूर्ण झालेली भातखाचर पुर्नजीवनाच्या कामाची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेल्या पाटचारी दुरुस्तीचे कामांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी मनरेगाची मजुरी वेळेत मिळते का? याविषयी मजुरांना विचारणा केली. सोबत उाविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, उपविभागीय कृषि अधिकारी एस.के. सांगळे, साकोलीचे तहसिलदार खडतकर, तालुका कृषि अधिकारी जी. के. चौधरी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. बी. इखार, लाखांदूरचे तहसिलदार विजय पवार, लाखांदूर तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी येसनसुरे, नायब तहसिलदार खोत तसेच स्थानिक स्तर कार्यालयातील अधिकारी व यंत्रणांचे अधिकारी व क्षेत्रिाय कर्मचारी उपस्थित होते.