गरजुंना शासकीय योजनांचा लाभ द्यावा -भाजपा

0
20

गोंदिया : केंद्र शासनाव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक लोन, जनधन योजना, प्रधानमंत्री अपघात विमा योजना आदी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, बँकाव्दारे मुद्रा बँक लोन योजनेच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. तसेच गरजुंना वारंवार चकरा मारायला लावले जाते. अनेक बँका टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगून हात झटकतात. यामुळे अनेक गरजुंची निराशा होते. तसेच इतर शासकीय योजनांची माहिती दिली जात नाही. हे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही. बँकांनी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या योजनांचे गांर्भीय लक्षात घेवून तळागळातील गरजुंना लाभ देवून मदत करावी, या मागणीचे निवेदन भाजपा शिष्टमंडळाने आज २४ मे रोजी रेलटोली येथील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात लिड बँक जिल्हा व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव यांना दिले.
यावेळी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करून काही बँकांकडून प्राप्त अनुभवांची माहिती दिली. तसेच बँकेचा शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत असाच व्यवहार राहिला तर १५ दिवसानंतर भाजपातर्फे बँकांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. शिष्टमंडळात  नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,विनोद अग्रवाल,  न.प. गटनेते दिनेश दादरीवाल, दीपक कदम, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, संजय मुरकुटे, पंकज सोनवाने, ऋषीकांत शाहू, पन्नालाल मचाडे, परसराम हुमे, धनंजय रिनायत, मुकेश हलमारे, कुशल अग्रवाल, असीत टेंभरे, किशोर कटरे, नरेश नागरीकर आदींचा समावेश होता.