राहुल बजाज सीबीएसई दहावीत अव्वल

0
5

गोंदिया : शहरातील पाच शाळांसह देवरीतील एका शाळेतून विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसई अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती. त्या सर्व शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. त्यात गोंदियातील साकेत पब्लिक स्कूलच्या राहुल बजाज या विद्यार्थ्याने ९८.८0 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान साकेत स्कूलच्या तृप्ती बिसेन हिने ९७.८0 टक्के गुण घेऊन पटकावला, तर तिसरा क्रमांक सेंट झेव्हीयर्सचा दीप कलंत्री व गोंदिया पब्लिक स्कूलच्या निखिल बिसेन यांनी याने ९७.६0 टक्के गुण घेऊन पटकावला आहे. सेंट झेव्हियर्स स्कूलमधून १२0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी २६ जण प्रावीण्य श्रेणीत, साकेत पब्लिक स्कूलमध्ये ६५ पैकी १९, प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील ४५ पैकी १८ तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील १७ पैकी ५ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी गाठली. देवरीतील न्यू सीता पब्लिक स्कूलनेही १00 टक्के निकाल दिला.

हिमांशू पटले (९५.00)
प्रोग्रेसिव्ह स्कूल यश वाधवानी (९५.00)
प्रोग्रेसिव्ह स्कूल ज्योत्स्ना लटारे (९५.00)
दिल्ली पब्लिक स्कूल ईशा मेश्राम (९६.८0)
सेंट झेव्हियर्स स्कूल वैष्णवी मुनघाटे (९७.00)
गोंदिया पब्लिक स्कूल निखिल बिसेन (९७.४0)