अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

0
13

नागपूर, दि. 2 –  राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गुरुवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाºया जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ जून ही आहे. नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २५,२९२ जागा आहेत. 

आवश्यक कागदपत्रे…
– बारावीची गुणपत्रिका
– शाळा सोडल्याचा दाखला
– जात प्रमाणपत्र
– नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
– जात वैधता प्रमाणपत्र
– अधिवास प्रमाणपत्र
वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे       २ जून ते १६ जून
कागदपत्रांची पडताळणी        २ जून-१७ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी१९ जून
अंतिम गुणवत्ता यादी        २२ जून
‘कॅप’च्या पहिल्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’२२ जून ते २५ जून
तात्पुरती वाटप यादी (पहिली फेरी)२७ जून
‘कॅप’च्या दुसºया फेरीसाठी ‘रिपोर्टिंग२८ जून ते ५ जुलै
तात्पुरती वाटप यादी (दुसरी फेरी)७ जुलै
‘कॅप’च्या तिसºया फेरीसाठी ‘रिपोर्टिंग८ जुलै ते १२ जुलै
तात्पुरती वाटप यादी (तिसरी फेरी)१४ जुलै
‘कॅप’च्या चौथ्या फेरीसाठी ‘रिपोर्टिंग१५ जुलै ते १८ जुलै
रिक्त जागा (चौथी फेरी)२० जुलै
‘कॅप’च्या चौथ्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’२१ जुलै ते २४ जुलै
तात्पुरती वाटप यादी (चौथी फेरी)२६ जुलै
वर्गांना सुरुवात        १ आॅगस्ट
तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अ‍ॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात.  एआरसीमध्ये आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून घेऊ शकतात. प्रवेशप्रक्रियेअगोदर विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागणार आहे. ‘डीटीई’च्या नव्या नियमांनुसार यंदा विद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.