दहावीच्या जुलै-ऑगस्टमधील परीक्षांच्या तारखा जाहीर

0
11

गोंदिया,दि.22-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा- इयत्ता दहावीच्या जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांच्या व इतर विषयाचे वेळापत्रक तयार केले असून, त्याबाबतच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत. परीक्षेचे तारीखनिहाय निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जुलै-ऑगस्ट 2016 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
वेळापत्रकाच्या अनुषंगाने इयत्ता 10 वीच्या लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी इत्यादी परिक्षांच्या तारखा पुढील प्रमाणे निश्चित केल्या आहेत. लेखी परीक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट 2016, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आसीटी) विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा 0000000, श्रेणी / तोंडी परीक्षा, पूर्व व्यावसायिक परीक्षा, अंध व अपंगासाठी कार्यानुभव, तंत्र व पूर्व व्यवसायिक प्रात्यक्षिक परीक्षा- 9 जुलै ते 16 जुलै 2016 रोजी. अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 16 जुलै 2016 रोजी. आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 ऑगस्ट 2016 रोजी.
www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. लेखी परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळांकडे विभागीय मंडळामार्फत देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या छापील वेळापत्रकावरुन खात्री करुन घ्यावी व परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरु नये, असे आवाहन सचिव राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.