जि.प.च्या शाळामंध्ये प्रेरणा दिवस उपक्रम

0
8

जिल्हाधिकारीसह सर्व विभागप्रमुखांनी दिल्या शाळांना भेटी

गोंदिया,दि.11 :- गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजपासून ‘प्रेरणा दिवस’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या गुरूवार प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ असल्याने तो अधिकाधिक सुसंस्कारित व्हावा. त्याला मोठे स्वप्न पाहता यावे आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळावी,यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला.या प्रयोगाची अमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना वाचता यावे यासाठी हा उपक्रम असून वर्ग 1 व 2 चे अधिकारी हे दर महिन्याच्या दुसर्या गुरुवारी दिलेल्या तालुक्यातील शाळेला भेट देणार आहेत.
unnamedyविद्यार्थ्यांची जळण-घळण शालेय जीवनातच व्हावी याकरीता ‘ प्रेरणा दिवस ‘ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाधिकरी डॉ विजय सूर्यवंशी यांनी गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील शाळेत,पंचायत विभागाचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी आमगाव तालुक्यातील अंजोरा शाळेला,तर गोंदियाचे तहसिलदार हिंगे यांनी पांढराबोडी शाळेत जाऊन तर जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील दोन जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

स्वप्न बघण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या, स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्यासमोर प्रेरणा असणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीचे आपण प्रेरक बना, त्याकरिता शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आपण मनापासून योगदान देवून आपल्या नियमित कामकाजातून वेळ काढून महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा असे आदेश अधिकार्यांना दिले आहे.जीवनात सुख-दु:खाचे यशाचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा र्मयादित ठेवून ध्येय पूर्तीसाठी जे धडपडतात तेच समोर जातात. एखाद्या पलीकडे पाहण्याची आपली दृष्टे बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते मत जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. तर विद्यार्थ्यांनी देखील आजच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन आम्हाला मार्गदर्शन करत प्रेरणा दिल्याने आणि वेळेचे महत्व पटवून दिल्याने आनंद विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे