श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर;टिळक गौरव पुरस्काराचे मानकरी भगत ठकरानी

0
17

unnamed (2)पवार,दोनोडे,नागनाथे,भेंडारकर,अग्रवाल,मेश्राम,मोटघरे सपाटे ठरले मानकरी

गोंदिया:- श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही १५ आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुस्काराचे वितरण तसेच जिल्ह्यातील १० व १२ वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकाराच्या प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीच्या वतीने या प्रवेशिकाची छाननी करून या वर्षीच्या श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. यामध्ये संघाच्यावतीने देण्यात येणारा टिळक गौरव पुरस्कार गोंदिया बाजारचे संपादक भगत ठकरानी यांना तर स्व.संतोष अग्रवाल शोध वार्ता प्रथम पुरस्कार सकाळचे राजू दोनोडे तर विकास वार्ता पुरस्कार प्रिंटमेलचे राधेश्याम भेंडारकर यांना जाहीर झाला आहे.unnamed (3)

या वर्षीच्या जीवनगौरव टिळक पुरस्कारासाठी श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने गोंदिया शहरातील ज्येष्ठ पत्रकार व गोंदिया बाजारचे संपादक भगत ठकरानी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. इतर स्पर्धा गटासाठी स्व. मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कारासाठी टीआरपी न्युजचे कार्यकारी संपादक मोहन पवार, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन विकास वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार प्रिटमेलचे अर्जुनी मोरगाव प्रतिनिधी राधेश्याम भेंडारकर व द्वितीय लोकमत समाचारचे आमगाव प्रतिनिधी रितेश अग्रवाल यांना दिला जाणार आहे. श्रमिक पत्रकार संघ वृत्त वाहिनी प्रथम पुरस्कारासाठी आयबीएन व युसीएनचे प्रतनिधी हरिष मोटघरे व द्वितीय पुरस्कारासाठी न्युज नेशनचे ओमप्रकाश सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार सकाळचे सालेकसा तालुका प्रतिनिधी राजू दोनोडे व द्वितीय पुरस्कार तरुण भारतचे प्रमोद नागनाथे यांना जाहीर करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कारासाठी स्वंतत्र छायाचित्रकार प्रा.शरद मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

याचप्रमाणे वर्ग १२ वी व १० वी च्या बोर्ड परीक्षेत प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार व पूरस्कार देउन सम्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये वर्ग १२ वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणारा किशोर ओमकार काळबांधे , वर्ग १० वीची सावी उल्हास गाडे गोणे, चंचल अजय अग्रवाल व आस्मा कलिम उल्हाखान चा समावेश आहे. यावर्षी श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी उत्सर््रित्या सहभाग घेतला. परीक्षक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे व लोकसत्ताचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी जवाबदारी पार पडली. सर्व विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता राईस मिलर्स असो.च्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य प्रल पटेल, खासदार नाना पटोले, आमदार राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकात पुलकुंडवार, राईस मिलर्स असोचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जि.प.सभापती रचना गहाणे,पी.जी.कटरे,देवराज वळगाये,छाया दसरे व विमल नागपूरे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव संजय राऊत, कोषाध्यक्ष महेंद्र बिसेन, कार्यक्रम संयोजक चंद्रकुमार बहेकार,ओमप्रकाश सपाटे,हरिष मोटघरे,मार्गदर्शक प्रा.एच.एच.पारधी,सदस्य सावन डोये,खेमेंद्र कटरे,उदय चक्रधर,भरत घासले,सुरेश येळे,प्रमोद भोयर,नविन अग्रवाल,दिलीप लिल्हारे,देवेंद्र बिसेन,महेंद्र माने,विकास बोरकर,आनंद मेश्राम,मुनेश्वर कुकडे,विजय सावंत,दिपक कदम,बाबाभाई शेख आदी श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.