औरगांबाद जि.प.अति.सीईओ मारहाणीचा गोंदिया जिप अधिकार्यानी केला निषेध

0
11

गोंदिया,दि.11 – औरगांबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांनी केलेल्या शिवीगाळ, मारहाणीचे औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये तीव्र पडसाद उमटले. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी (ता.11)गोंदिया जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गांनी काम बंद आंदोलन करुन मुख्यमंत्री यांच्या नावे प्रभारी सीईओ जयंवत पाडवी यांना निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग.दी.कुलथे,अध्यक्ष इंजि.मनोहर पोकळे व सरचिटणीस समिर भाटकळ यांच्या आवाहनावर काम बंद आंदोलन करुन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.निवेदन देतेवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,मग्राहोहयोचे उपमुकाअ भेंडारकर,दिशा मेश्राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.