रुग्णालय समस्यांना घेऊन मुंडण आंदोलन

0
17

गोंदिया berartimes.com-:गेल्या पाच दिवसापासून गोंदिया शहरातील कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन सामाजिक कार्यकर्ता बंसत ठाकूर यांनी बेमुदत आंदोलनाला सुरवात केली आहे.ठाकूर यांनी आपल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज स्वत व आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यासंह मुंडण करुन शासनाच्या व आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदविला.14 आॅगस्टपासून सुरु या आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले यांच्यासह शिवसनेचे जिल्हाध्यक्ष व आरोग्यमंत्री डाॅ.दिपक सावंत यांचे सहकारी म्हणून मुकेश शिवहरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकायानी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला.जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.पातुरकर व वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डाॅ.अजय केवलिया यानीही त्यांच्या मागण्या आरोग्य विभागाकडे पोचवून त्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले परंतु जोपर्यंत आरोग्य मंत्री स्वत रुग्णालायीतील समस्या सोडविण्यासंबधीचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय ठाकूर यांनी घेतला आहे.