25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home शैक्षणिक आदिवासी विकास हाय. खजरीचे ए.डी.मेश्राम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

आदिवासी विकास हाय. खजरीचे ए.डी.मेश्राम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0
61

सडक अर्जुनी= आदिवासी विकास हाय. व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खजरी येथील तंत्रस्नेही, गायक, वादक, अध्यापनात पारंगत असणारे,कर्त्तव्यदक्ष, शाळेकरीता निःस्वार्थ व समर्पनाच्या भावणेतून कार्यकरणारे अष्टपैलु व्यक्तिमत्वाचे धनी  ए.डी. मेश्राम यांना राज्यस्तरावर वीडियो निर्मितीत दूसरा क्रमांक मिळाला.
ए.डी.मेश्राम द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल आपल्या यशाचे मानकरी संस्थेचे अध्यक्ष जगतराम रहांगडाले, संस्थेचे सचिव नारायण येळे, आदिवासी विकास हाय.व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य डी.डी.रहांगडाले,श्री चव्हाण गटशिक्षणाधिकारी प. स. सडक अर्जुनी, श्री बीजेवारर केंद्रप्रमुख डव्वा,टी.एम.राऊत,सुनील राऊत गटसाधन केंद्र सडक अर्जुनी,जुनिअर कॉलेज प्रभारी योगराज परशुरामकर, परीक्षा प्रमुख लांजेवार , छायाताई चव्हाण यांना दिले. मेश्राम सरांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.