ओबीसी संघर्ष कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
8

गोंदिया:- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना जिल्हाधिका-यांन मार्फत आज बुधवारला दिवेनदन देउन ओबीसंीवर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यात आला.
महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने ६ डिसेंबरला काढण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये ओबीसी प्रर्वगरसाठी एकही जागा आरक्षित न करता खुल्या प्रर्वगासाठी ७५ टक्के जागा आरक्षित करून ओबीसी समाजावर केलेल्या अन्यायाच्या विरोधात राष्टÑीय ओबीयी महासंघ व गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे.सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर व-हाडे, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, महासचिव मनोज मेंढे, शिशिल कटरे, संघटक जिवन लंजे, प्राध्यापक संजिव रहांगडाले, विष्णू नागरिकर, बंसीधर शहारे, रामकृष्ण गौतम, एल.ए. धपाडे, धानसिंग बघेले, आदि उपस्थित होते.