बीईओ मांढरेच्या हलगर्जीपणाचा फटका 36 विद्यार्थ्यांना

0
7

३६ विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षे पासून वंचित
गोंदिया,दि.07- जिल्ह्यातील तिरोडा येथील शहिद मिश्रा विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांना तिरोडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे यांच्या हलगर्जीपणाचा फटका बसल्याने नवोदय विद्यालयाच्या परिक्षेपासून वंचित होण्याची वेळ आली.त्यामुळे अशा बीईओवर मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी कारवाई करतात की त्यांची बाजू घेत सावरतात याकडे लक्ष लागले आहे.
तिरोडा तालुक्यातील शहीद मिश्रा हायस्कूल मधील ३६ विद्यार्थी हे नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला बसले होते. याची तयारीही विद्यार्थ्यांनी मागील वर्षी पासून सुरु केली होती. शाळेतील मुख्यध्यापकांनी या संदर्भातले संपूर्ण कागजपत्रे हे तिरोडा पंच्यात समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले.मांत्र गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी मुलांचे सर्व कागदपत्र हे नवोदय विद्यलयाकडे वेळेवर न पाठविता उशिरा पाठविल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र तयार झालेच नाही.याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी शहीद मिश्रा हायस्कुलच्या मुख्याध्यापकांना द्यावयास हवी होती,परंतु त्यांनी माहितीही न दिल्याने शाळेचे मुख्याध्यापक या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ राहिले. ८ जानेवारीला नवोदयची परीक्षा असल्यामुळे मुख्यध्यापकानी गटशिक्षणाधिकरी मांढरे याच्याकडे प्रवेश पत्र मागितले असता हा सर्व प्रकार समोर आला.या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्याच्यावर योग्य कारवाही वरिष्ठांनी करावी अशी मागणी शहीद मिश्रा शाळेतील मुख्यध्यापक तसेच मुलांच्या पालकांनी केली आहे.दोषी अधिकाऱ्यावर जर वरिष्ठ अधिकाऱ्याने सेवेतून निलंबनाची कार्यवाही केली नाही .तर रस्त्यावर उतरत आंदोलन करणायचा इशारा पालकांनी जिल्हा प्रशाशनाला दिला आहे.