25.5 C
Gondiā
Monday, July 20, 2026
Home Top News नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील १० वाहने

नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील १० वाहने

0
16

गडचिरोली, दि.७: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अगदी जवळ असलेल्या छत्तीसगड राज्यातील रस्त्याच्या कामावरील १० वाहने जाळल्याची घटना घडली.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी गावापासून काही किलोमीटर अंतर गाठताच छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते. छत्तीसगड राज्यातील पाखांजूर तालुक्यातील ‘१८ नंबर’ या गावात आज मध्यरात्री सशस्त्र नक्षल्यांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरील १० वाहने डिझेल ओतून पेटवून दिली. यात टँकर जोडलेले ८ ट्रॅक्टर, एक जेसीबी व एका रोलरचा समावेश आहे.
रस्त्याचे काम पुणे येथील इंगवले कंस्ट्रक्शन कंपनीचे असून, गडचिरोलीतील काही जण सहयोगी कंत्राटदार म्हणून ते काम करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या दहा दिवसांतील वाहने जाळण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज वाहतूक करणारी ८० वाहने नक्षल्यांनी जाळली होती, हे येथे उल्लेखनीय.