महिनाभरात निघाले दोन आदेश : गोंदिया बाजार समितीत संचालकांच्या नातलगांना नोकरी

0
13

गोंदिया,दि.07 : कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्ष्टाचार दिवसेंदिवस उघड होत असतानाच आता बाजार समितीतील संचालकांना आपल्या नातलगांना नोकरीवर घेवून एकाच महिन्यात त्यांना कायम केल्याची बाब मुकुंद खोबाग्रडे आणि जितेंद्र खोब्रागडे यांनी उघड केली. यासंदर्भात चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
जितेंद्र खोब्रागडे आणि मुकुंद खोब्रागडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, सहकार विभागाच्या नियमानुसार एकमित कर्मचार्यांना सहा महिन्यापर्यंत कंत्राटी तत्वावर काम केल्यानंतरच कायम केले जाते. परंतु, गोंदिया बाजार समितीत दिनेश लिल्हारे,भूलेश्वर रहांगडाले,सौरभ तूरकर, अतुल हरिणखेडे, रवी लिल्हारे हे संचालकांचे नातलग आहेत. त्या पाचही जणांना १० आॅकर्टोबर २०१६ रोजी एकमित कर्मचारीचे आदेश दिले.
लगेच त्यांना १ नोव्हेंबर २०१६ रोजी वेतन श्रेणी देखील लागू करण्यात आली. कायम करण्यात आलेले कर्मचारी सभापती चुन्नीलाल बेंदरे, उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक आनंद तुरकर, तिर्थराज हरीणखेडे आणि विठोबा लिल्हारे यांचे नातलग आहेत. बाजार समितीत अशा प्रकारे पदभरतीत मोठ्या पÑमाणात घोळ करण्यात आला. यापूर्वी ज्यांना कसल्याही प्रकारे अनुभव नाही, अशांना नोकरी बहाल करण्यात आली होती. याउलट ज्यांनी पाच वर्षें एकमित कर्मचारीम्हणून काम केले. स्थायी करण्यासाठी ते पात्र असताना आणि जागा रिक्त असताना देखील त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. आता संचालकांनी चक्क अपल्याच मुलांना आणि नातलगांना नोकरीवर घेतल्याची माहिती उघड झाल्यामुळे असे अनेक पÑकार उघड होण्याची दाट शक्यता अहे. या पÑकारावर तत्काळ कारवाई करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अश्ी मागणी त्यांनी निवेदनातून केली. निवेदनाची पÑत राज्याचे पणन संचालक, अणि सहायक निबंधक यांच्याकडे देखील करण्यात आली. जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आलेल्या तकÑारीत म्हटले की, चुन्नीलाल बंदÑे यांचा भाचा दिनेश लिल्हारे, धनलाल ठाकरे यांचा जावई भुलेश्वर रहांगडाले, आनंदतुरकर यांचा मुलगा सोरभ तुरकर, तिर्थराज हरिणखेडे यांचा मुलगा अतुल हरिणखेडे, विठोबा लिल्हारे यांचा पुतण्या रवी लिल्हारे यांना नोकरीवर लावल्याची तक्रार करण्यात आली.