प्राध्यापक संतोष चोपकर यांना भूगोल विषयात आचार्य पदवी

0
12

गोंदिया : येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील भूगोल विभागातील अंशकालीन अधिव्याख्याता प्रा. संतोष मधुकर चोपकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारा भूगोल विषयात आचार्य पदवी नुकतीच प्राप्त झाली.प्रा. संतोष चोपकर यांनी एमबीपटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र बिसेन व एमएमडी महाविद्यालयीतल भूगोल विभाग प्रमुख डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भंडारा जिल्ह्यातील कृषी विकासात जलसिंचनाची भूमिका जल व्यवस्थापन एक भौगोलिक दृष्टिक्षेफ’ या विषयावर रा.तु.म. नागपूर विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. संतोष चोपकर यांनी आपल्या यशाचे श्रेय गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खा. प्रफुल्ल पटेल, उपाध्यक्ष वर्षा पटेल, संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, प्राचार्य योगेश नासरे यांना दिले आहे.