धनवंतरी हरिणखेडे राज्यस्तरीय परीक्षेत अव्वल

0
13

गोंदिया : इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्रद्वारा आयोजित राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूलची धनवंतरी हरिणखेडे इयत्ता १0 वी ची विद्यार्थिनी संपूर्ण राज्यस्तरावर तृतीय स्थान तर विदर्भात प्रथम स्थानाची मानकरी ठरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रतील एकूण १५ हजार ६७ विद्यार्थ्यांमध्ये तिने १00 पैकी ९४ गुण मिळवून हे उल्लेखनीय यश प्राप्त करून प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूलला गौरवान्वित केले आहे. यशस्वी विद्यार्थिनीने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबांना त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव नीरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय. आशा राव, अभय गुरव यांना दिले आहे. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने यशस्वी विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.