बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज

0
15

चंद्रपूर दि.११:चंद्रपूर शहरातील नागरिकांची जुनी आणि प्रलंबित मागणी असलेल्या बहुप्रतिक्षीत बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त एकदाचा सापडला असून, शनिवारी सायंकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी आमदार नानाजी शामकुळे हे उपस्थित राहणार आहेत.
चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून नानाजी शामकुळे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर २00९ पासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे उड्डाणपुलाअभावी या मार्गावर दिवसभरातून अनेकदा वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. ये-जा करणार्‍यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याने उड्डाणपुलाची मागणी सर्वचस्तरातून होऊ लागली. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांनी केलेले प्रय▪फळाला आलेले आहे. या पुलासाठी सुमारे ६१ कोटी रुपये खर्च येणार असून, यापैकी १६ कोटी रुपये केंद्र सरकार आणि ४५ कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. रेल्वे लाईनच्या पलीकडे बाबूपेठमध्ये महसूल विभागाच्या जागेवर ६८ नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. तर अलिकडे बागला चौक परिसरात रेल्वेलाईनलगत ३६ नागरिकांचे अतिक्रमण आहे. बाबूपेठमधील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचे प्रय▪सुरू आहेत. यासाठी साधारणत: ३ कोटी रुपये खर्च असून, भूमिअधिग्रहण आणि अतिक्रमणधारकांना नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.