अदानी फाऊंडेशनतर्फे ‘फिरते रुग्णालय’

0
8

गोंदिया,दि.१७:’खलु माध्यम धर्म साधनम्’ म्हणजेच सुदृढ शरीर धर्म साधनेचे माध्यम असलेली आरोग्यसेवा सर्वांना मिळावी, या उद्देशाने अदानी फांडेशनतर्फे १४ मार्च रोजी फिरत्या रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला.
या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, गटविकास अधिकारी दुबे, अदानी पॉवर लिमिटेडचे तिरोडा प्रमुख सी.पी. शाहू, अदानी फाऊंडेशनचे सी.आर.एस. हेड व सर्व विभाग प्रमुख्याच्या उपस्थितीत पार पडले.
अदानी फाऊंडेशनच्या कार्यक्षेत्रातील २४ गावांमध्ये फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा गेल्या तीन वर्षापासून दिली जात आहे. नागरिकांची आर्थिक बचत व्हावी व उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. रुग्ण तपासणीच्या संख्येनुसार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उपक्रमामध्ये देशातील उपक्रमांपैकी अदानी फाऊंडेशन तिरोड्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो, हे विशेष.
आरोग्य, शिक्षण, आजिविका व ग्रामीण पायाभूत सुविधा मानवी जीवनास महत्वाच्या आहेत. त्यापैकी अदानी फाऊंडेशन तिरोड्याच्या वतीने फिरत्या रुग्णालय सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे. यापुढे २६ गावांना फिरत्या रूग्णालयाचा लाभ देण्यासाठी या रुग्णालयाचे हस्तांतरण हेल्पेज इंडिया या संस्थेला करण्यात आले आहे. हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून अदानी फाऊंडेशन ५0 गावातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध आहे.उल्लेखनीय म्हणजे, तिरोडा येथे अदानी पॉवर प्लांट सुरू झाल्यानंतर अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात आरोग्य, शिक्षण व मूलभूत सोयीसुविधांसाठी आजावर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा तिरोडा शहरासह तालुकावासीयांना मोठा लाभ झाला असून नागरिकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.