शालेय पोषण आहाराची ऑनलाईन चोरी

0
16

पिंडकेपार जि.प.शाळेतील प्रकार,विद्याथ्र्यांना पोषण आहार न देताच दिल्याचा अहवाल,शिक्षणाधिकाNयांकड़े तक्रार
गोदिया,दि.२१-(berartimes.com) – विद्याथ्र्यांना जानेवारी महिन्यात पोषण आहार न देताच शालेय पोषण आहार दिल्याचा ऑनलाईन अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये असा प्रकार घडत तर नसावा? अशा शंकाना पेव पुâटले आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०९९ शाळा तर २५९ खासगी अनुदानित शाळा आहेत. या शाळांतील १ लाख २५ हजार ७५ विद्याथ्र्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. या शाळांना महाराष्टर वंâजुमर पेâडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. मात्र,पोषण आहाराचे बिल पेâडरेशनला देण्यात न आल्याने डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ या महिन्यात पोषण आहार वितरीत करणे थांबविले होते. ज्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळांमधील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहीले होते.
गोरेगाव पंचायत समितीतंर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत शालेय विद्याथ्र्यांना मधान्ह भोजन देण्यात येतो. वर्ग १ ते ५ वी पर्यंतच्या विद्याथ्र्यांना शंभर ग्राम तथा ६ ते ७ वी पर्यंतच्या विद्याथ्र्यांना १५० ग्राम पोषण आहार प्रति विद्यार्थी देण्याचे प्रावधान आहे. तेव्हा १२५ विद्याथ्र्यांना १४.५० किलो पोषण आहार दररोज शाळेत बनविण्यात येतो. जानेवारी महिन्यात वंâत्राटदारांकडून पोषण आहार जिल्ह्यातील एकाही शाळेला वितरीत करण्यात आले नव्हते. दरम्यान शिक्षण विभागाने आदेश दिले होते की, ज्या शाळांकडे शिल्लक असलेला पो,ण आहार विद्याथ्र्यांना देण्यात यावा. नाही तर दुसNया शाळांकडून तात्पुरत्या स्वरूपात पोषण आहार घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र,पिंडकेपार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार उपलब्ध नसल्याने १ ते २३ जानेवारीदम्यान विद्याथ्र्यांना पोषण आहार देण्यात आले नाही. परंतु येथील मुख्याध्यापकाने शालेय विद्याथ्र्यांना पोषण आहार दिल्याचे ऑनलाईन अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केला. दरम्यान १६ मार्च रोजी ग्राम पंचायत पदाधिकारी व पालक भेटीदरम्यान हे बिंग पुâटले. या शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी शासनाची दिशाभूल करीत शालेय पोषण आहार विद्याथ्र्यांना दिल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागाला दिला आहे. याप्रकरणाची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलवुंâडवार, शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचेकडे करण्यात आली आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील अन्य जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही चौकशीअंती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाNयांनी जर चौकशी केली शालेय पोषण आहाराची ऑनलाईन चोरी समोर येवू शकतो.

चौकशीचे आदेश दिले
पिंडकेपार येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराबाबतची तक्रार आमच्या विभागाकडे आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्याधपक दोषी असेल तर नक्किच त्यांचेवर कारवाई करण्यात येईल.- उल्हास नरड,शिक्षणाधिकारी,जि.प.गोंदिया