सीबीएसईच्या परिक्षेत गोंदिया जिल्ह्यात अंकित रहागंडाले प्रथम

0
14

गोंदिया,दि.28-प्रतिक्षेनंतर आज रविवारला (केंद्रीय परिक्षा बोर्ड) सीबीएसई च्या 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर झाले.गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध येथील शासकीय नवोद्य विद्यालय आणि गोंदिया येथील गोंदिया पब्लीक स्कुल,सेंट झेवियर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डीची परिक्षा दिली होती.जिल्ह्यात सीबीएसईच्या परिक्षेत अंकित रहागंडाले या विद्यार्थ्याने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.यामध्ये नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयाचे 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के निकाल लागला आहे.त्याचप्रमाणे गोंदिया पब्लीक स्कुलचा सुध्दा 100 टक्के निकाल लागला असून 38 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये दिपक कटरे याने 93.40 टक्के गुण प्राप्त करुन गोंदिया शहरात प्रथम क्रमांक पटकावला.तर निहार श्रीवास्तवने 93.20 टक्के गुण घेऊन व्दितीय,मोहित भगताने 91.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.सत्यम कटरे यांने 91 टक्के गुण मिळविले आहे.या विद्यार्थ्यांचे गोंदिया पब्लीक स्कुलच्या प्राचार्य व संस्थापकांनी अभिनंदन केले आहे.